मुंबईमधील विले पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील एका 21 वर्षीय मुलीने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटणेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव संध्या पाठक असून ती साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होती. मात्र तिने आत्महत्या केली की ती पडली याबद्दल प्रश्न उपस्थित राहत आहेत. संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.