(Mono Rail) मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प असताना आता चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे.
चेंबूर–भक्ती पार्कदरम्यान मोनोरेलला अचानक तांत्रिक बिघाड झाला. यानंतर ट्रेन थांबली आणि डब्यांतील एसी बंद झाला. ही मोनोरेल पूर्णपणे बंद असल्याने आतील व्हेंटिलेशन थांबले गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांनी तात्काळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नंबरवर मदतीसाठी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करण्यासाठी प्रवाशांना इमर्जन्सी दरवाज्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. त्याचबरोबर, महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
मदतीसाठी क्रेन देखील घटनास्थळी दाखल झालं असून प्रवाशांना मोनोरेलमधून बाहेर काढण्यात येत आहे, अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी पोहोचले असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येत असून तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.