5G Plans Price | technology team lokshahi
ताज्या बातम्या

भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असून 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे. नुकताच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारनं दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असून 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे. नुकताच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारनं दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला आहे. लिलावानंतर 5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. आता ही सेवा 12 ऑक्टोबरपर्यंत सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

दूरसंचार विभागाच्या (DoT) माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, 5G सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालं आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्या टप्यानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5G सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5G सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल. तसेच पुढील दोन ते तीन वर्षांमद्ये देशभरात 5G सेवा पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime Update : पुण्यात गणेश विसर्जनाच्या आधी गोळीबार, गँगवॉरचा भयंकर उद्रेक!

Latest Marathi News Update live : गणपती विसर्जन आणि ईदनिमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

Anant Chaturdashi 2025 : बाप्पाला निरोप देताना "अनंताचा धागा" का बांधतात जाणून घ्या यामागचं महत्त्व

Anant Chaturdashi 2025 Wishes : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त गणेशभक्तांना पाठवा खास शुभेच्छा, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून ठेवा कोट्स स्टेटस