ताज्या बातम्या

स्वातंत्र्याची 75 वर्षे: 15 ऑगस्ट 1972 रोजी देशात पिन कोड सुरू झाला

भारतात 1970 च्या आधी पत्र हे संवादाचे मुख्य साधन होते. 1970 पूर्वी वेगवेगळ्या भाषा आणि एकाच नावाच्या अनेक ठिकाणांमुळे टपाल खात्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येला तोंड देण्यासाठी टपाल खात्याने पिन कोडला जन्म दिला, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्राची स्वतःची ओळख असते, तशीच व्यक्तीची ओळख म्हणजे त्याचा आधार क्रमांक. श्री राम भिकाजी वेलणकर, माजी अतिरिक्त सचिव, केंद्रीय दळणवळण मंत्रालय हे भारतात पिनकोडचे जनक म्हणून ओळखले जातात.

Published by : Siddhi Naringrekar

त्यांच्या प्रयत्नांमुळे १५ ऑगस्ट १९७२ रोजी भारतात पिन कोड प्रणाली सुरू झाली. त्यावेळी देशाची एकूण 9 झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती ज्यात 8 झोन देशाला देण्यात आले होते तर 9 वा आर्मी पोस्टल झोन वेगळा ठेवण्यात आला होता. टपाल खात्यात पिन कोड प्रणाली सुरू झाल्यानंतर दळणवळण अगदी सोपे झाले.

पिन कोड भारतात आणला

15 ऑगस्ट 1972 रोजी देशात पिन कोड लागू करण्यात आला. पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर. त्यावेळी देशाची 9 झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक झोनला वेगळा क्रमांक देण्यात आला होता. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी 1972 मध्ये याची सुरुवात केली होती. पिन कोड 6 अंकांचा बनलेला आहे. या कोडचा प्रत्येक अंक खास आहे जो तुमच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती देतो. त्यातील प्रत्येक क्रमांक केवळ एका विशिष्ट क्षेत्रासाठी बनविला जातो. या माहितीच्या मदतीने योग्य ठिकाणी माल पोहोचवता येतो.

6 अंकी पिनचा अर्थ काय आहे

पिन कोडमध्ये एकूण सहा क्रमांक ठेवण्यात आले होते. सुरवातीला पहिला क्रमांक राज्य दर्शवतो. दुसरा क्रमांक उप-प्रदेश ओळखतो. त्याच वेळी, तिसरा क्रमांक राज्यातील जिल्हा ओळखतो. तर पिन कोडचे शेवटचे 3 अंक पोस्ट ऑफिस ओळखतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य

BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष