ताज्या बातम्या

Video : जम्मू-काश्मीरच्या पेट्रोल पंपावरच दोन बसमध्ये मोठा स्फोट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका बसमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील आठ तासांमध्ये हा दुसरा स्फोट झाला आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पोलिसांच्या माहितानुसार, बुधावीर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उधमपूरमधील डोमेल चौक जवळील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बसमध्ये स्फोट झाला. सुदैवाने या बसमध्ये प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे. परंतु, जवळ उभे असलेले दोन स्थानिक नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.

मागील आठ तासांमध्ये हा दुसरा स्फोट आहे. याआधी सकाळी ६ वाजताच्या सुमारास जुन्या बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या बसमध्ये स्फोट झाला. या घटनेनंतर पोलीस आणि इतर यंत्रणांचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिकदृष्ट्या हा स्फोट दहशतवादी कट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका