ताज्या बातम्या

ऊसतोड मजुरांच्या ट्रकला अपघात; 15 जण जखमी

Published by : Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

सांगलीच्या जत मध्ये एका ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे.जत या ठिकाणी अचानक चालकाने ब्रेक दाबल्याने गाडी पलटी होऊन पदरा ऊसतोड मजूर हे जखमी झाले आहेत,यामध्ये लहान मुलांचे देखील समावेश असून जखमींना मिरचीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार साठी दाखल करण्यात आला आहे.

हे सर्व ऊसतोड मजूर बीड आणि जालना जिल्ह्यातील असून जत मार्गे ते कर्नाटक मधल्या बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते,जत मधून काही अंतरावर गाडी पोहोचली असता, चालकाने अचानक पणे गाडीचा ब्रेक दाबला आणि त्यानंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.त्यामध्ये गाडीमध्ये बसलेले 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत,सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झालेली नाही,तर अपघातामध्ये ट्रक मोठ्या प्रमाणात आणि ऊस तोड मजुरांच्या साहित्याचे नुकसान झालं आहे.

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."