मराठी माणसला आधी मेहनत करायला शिकवा असे विधान करुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्रीने अखेर माफी मागितली आहे. या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रारही दाखल केली असून अखेर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये मराठी समाजाविषयी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वर्सोव्यातील राहणाऱ्या मराठी अभिनेत्री राजश्री मोरेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्या व्हिडिओमध्ये तिने मराठी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केलं होते. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, मराठी माणसांमध्ये मेहनत करायला शिकवा, काम करण्याची मानसिकता मराठी माणसांमध्ये नाही आहे, दरम्यान परप्रांतीय मुंबई सोडून गेले तर मराठी माणसांची अवस्था बिकट होईल, असे मत व्यक्त केले. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. यानंतर मनसेच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाढत्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर, राजश्री मोरे हिला सार्वजनिक माफी मागावी लागली तसेच वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यास सांगण्यात आले. तिची माफी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे.
हेही वाचा...