Amit Mishra-Shahid Afridi  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Yasin Malik : यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात आफ्रिदीचे ट्विट; भारतीय गोलंदाजाने सुनावले

तुमच्यासारखे सर्वच दिशाभूल करणारे नसतात : भारतीय गोलंदाज

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासीन मलिक (Yasin Malik) याला दिल्लीतील एनआयए न्यायालय (NIA Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यावर पाकिस्तानमधील (Pakistan) अनेक नेत्यांसह खेळडूंनी यासीनच्या शिक्षेस विरोध केला आहे. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) ट्विट करत या प्रकरणात संयुक्त राष्ट्राकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता शाहिद अफ्रिदीला भारतीय गोलंदाजाने प्रत्युत्तर दिले आहे.

शाहिद आफ्रिदीने म्हंटले की, भारताकडून मानवाधिकारांचे हणन केलं जाते आहे. जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी यासीन मलिक काम करत होता आणि त्याला दोषी ठरवले आहे. भारताने या प्रकरणी मानवाधिकारांचे उल्लंघन केलं आहे. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात आता हस्तक्षेप करणे गरजेचं आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

शाहिद अफ्रिदीच्या या ट्विटला भारतीय गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) प्रत्युत्तर दिले आहे. प्रिय शाहिद आफ्रिदी यासीन मलिकने न्यायालयात स्वतः गुन्हा कबुल केला आहे. तुमच्या जन्मतारखे सारखे सर्वच दिशाभूल करणारे असू शकत नाही, असे अमित मिश्राने अफ्रिदीला सुनावले आहे.

दरम्यान, शाहिद अफ्रिदी आपल्या वयासंबंधी नेहमीच वादामध्ये राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार अफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 साली झाला. यानुसार त्याचे वय 42 वर्ष आहे. परंतु, 2019 रोजी शाहिद अफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबी येथे श्रीलंकेविरुध्द 37 बॉलमध्ये शतक केले होते. त्यावेळी तो केवळ 16 वर्षाचा होता. तर शाहिद अफ्रिदीने आपल्या गेम चेंजर या पुस्तकात लिहले आहे की, माझा जन्म 1975 साली झाला आहे. व त्यावेळी मी केवळ 19 वर्षाचा होतो. हाच धागा पकडून अमित मिश्राने शाहिद अफ्रिदीवर टीका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया