Order of Devendra Fadnavis : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्यांना कोणत्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर महायुतीमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना कामावर जाण्याचे आदेश दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचे सावट पसरले आहे. पुर्वी हे आदेश तोंडी स्वरुपात होते. आता मात्र या गोष्टींकडे मंत्री त्यांचे पीए दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या पीएननी त्यांना आपल्या विभागात दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सात मंत्र्यांना ओएसडी आणि पीए यांच्या निवडीबद्दलची परवानगी नाकारली आहे. दिलेल्या आदेशांना कठोर स्वरुपात असून तात्काळ अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्रांच्या या आदेशामुळे मंत्र्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेसह अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचे दिसत आहेत.
अनेक मंत्री बऱ्याच वेळेला पीएच्या निवडीबाबत खूप आग्रही असतात. पीए आणि ओएसडींची नियुक्ती करताना आपल्या विश्वासातले , जवळचे आणि विश्वासू असावे असा मंत्र्यांचा आग्रह असतो. मात्र काही पीए एकाच विभागामध्ये मंत्री वर्षानुवर्षे काम करत असल्याने भ्रष्टाचाराचा धोका निर्माण होऊ लागला आहे. याच कारणाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.