Varsova Police Station
Varsova Police Station Team Lokshahi
ताज्या बातम्या

"गुड टच, बॅड टच" च्या शिकवण नंतर समजले की तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार होत आहे

Published by : Team Lokshahi

रिध्देश हातिम मुंबई :-

"गुड टच, बॅड टच" च्या शिकवण नंतर समजले की तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार होत आहे लैंगिक अत्याचार प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी तरुणास अटक, मुंबईतील अंधेरी पश्चिम मधील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे

मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हा एकामेकांना परिचित होते. आरोपी हा पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे जाणे सुद्धा सुरू होते. त्यातूनच आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून अनेकदा त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केले. त्यादरम्यान मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे "गुड टच, बॅड टच" या विषयी विविध सामाजिक संस्थांनी जनजागृती केली जात असताना आपल्या सोबत चुकीचे घडल्याचे अल्पवयीन मुलीने आपल्या शिक्षिकेला सांगितले. यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षिकेने या संबंधित माहिती मुलीच्या पालकांना दिल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी आरोपी गोकुळ सिंह (21) याला सताबंगाला येथून अटक केली. यानंतर वर्सोवा पोलिसांनी आरोपीला अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी गोकुळ सिंह याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वर्सोवा पोलीस अधिकचा तपास करत आही. "गुड टच, बॅड टच" हा विषयी त्या अल्पवयीन मुलीला समजल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे असे कळले अशीच जनजागृती महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये झाली पाहिजे कारण त्यातूनच सर्व अल्पवयीन विद्यार्थ्यांना "गुड टच, बॅड टच" हा विषय समजेल

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण