Admin
Admin
ताज्या बातम्या

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोलापूरात पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा देण्याचा ठराव

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले.

याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामा देण्याचा ठराव करण्यात आला आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत या निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय निवृत्ती मागे न घेतल्यास शहरातील अध्यक्षासह सगळेच पदाधिकारी आणि प्रदेश प्रतिनिधी सामुहिक राजिनामा देतील. असा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य