ताज्या बातम्या

एअर कंडिशनरलाही एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या किती वर्षांनी बदलावा AC?

उष्णतेचा कहर वाढत आहे आणि अशा परिस्थितीत घरात थंडावा देण्यासाठी एअर कंडिशनर (AC) हाच एकमेव पर्याय ठरतो.

Published by : Team Lokshahi

उष्णतेचा कहर वाढत आहे आणि अशा परिस्थितीत घरात थंडावा देण्यासाठी एअर कंडिशनर (AC) हाच एकमेव पर्याय ठरतो. मात्र, बऱ्याचदा ग्राहकांना हे माहित नसते की एसीची एक मर्यादित कार्यक्षमता असते आणि एक वेळ अशी येते की तो बदलणे आवश्यक ठरते.

एसी कधी बदलावा?

तांत्रिकदृष्ट्या एसीला "एक्सपायरी डेट" नसली तरी कालांतराने त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते. सुरुवातीला उत्तम थंडावा देणारा AC काही वर्षांनंतर गारवा कमी करतो, आवाज करतो आणि वारंवार दुरुस्तीची गरज भासू लागते.

योग्य मेंटेनन्स असल्यास स्प्लिट किंवा विंडो प्रकारातील एसी 10 ते 15 वर्षे व्यवस्थित चालू शकतो. मात्र, 8-10 वर्षांनंतर त्याच्या कूलिंग क्षमता हळूहळू कमी होते. यामागील कारणे म्हणजे जुना कॉम्प्रेसर, गॅस लीक होणे किंवा फॅन मोटरचे खराब होणे. याशिवाय, जुने मॉडेल्स R22 (Freon) गॅसवर चालत असतात, जी सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने बंद करण्यात आली आहे. नव्या तंत्रज्ञानात R32 किंवा R410A सारख्या पर्यावरणपूरक गॅसेसचा वापर होतो.

जर दरवर्षी AC सर्व्हिसिंग व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात रिपेअरिंग करावी लागत असेल, गॅस वारंवार भरावी लागत असेल किंवा स्पेअर पार्ट्स मिळणे कठीण झाले असेल, तर अशा AC ला रिप्लेस करणेच अधिक फायदेशीर ठरते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा