ताज्या बातम्या

अजित पवारांना डेंग्यूची लागण, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लागण झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. आणि या सर्व चर्चांणा पूर्णविराम दिलं आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल यांच ट्विट-

श्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या सट्टा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांच्या विरोधात, मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. श्री.अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा तो पूर्णपणे बरा झाला की, तो आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येईल.

डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा