ताज्या बातम्या

तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही : अजित पवार

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा हा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे. हा प्रकल्प राज्यातून जात असेल, तर गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे.” रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे, असं विचारलं असता अजित पवार यांनी म्हटलं, “तोही प्रकल्प राज्यात व्हावा. ज्यामाध्यमातून राज्याला रोजगार, गुंतवणूक, देशाला आणि राज्याला जीएसटी मिळेल, असे प्रकल्प आले पाहिजे. हे प्रकल्प येताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये,”

यासोबतच “देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २ लाख कोटींची गुंतवणूक आणि २ लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, तुमचे केंद्र सरकारसह चांगले संबंध आहे. तुमच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. वेदान्तने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडलं होते. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशाराच अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

तसेच वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली.हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी

Google Gemini News Trend : गुगल जेमिनी काय ऐकत नाही! रेट्रो-थ्रीडी मॉडेल फोटोनंतर जेमिनी घेऊन आलं नवा ट्रेंड

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी