ताज्या बातम्या

'राजकारणात कोणी कायमचा दुश्मन आणि कायमचा मित्र नसतो' अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये पार पडली.

Published by : shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी राजकारणात कोणी कायमचा दुश्मन आणि कायमचा मित्र नसतो. हे राजकारण आहे”, असं अजित पवार यांनी भाषणातून स्पष्ट केलं आहे. तसच अनेक मुद्द्यावर देखिल यावेळी ते बोलले आहेत.

बीडमधील जनतेचे कौतुक

“मराठवाडा ही संतांची भूमी आहे. बीड ही कष्टकरी बांधवांची भूमी आहे. आम्ही महापुरुषांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारी माणसं आहोत. बीडची जनता ही राजकारण, समाजकारणाबाबत जाणकार आहोत

शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार

आम्ही महायुतीत असलो तरी सर्व जाती धर्माचे लोकांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे अनेकांनी विमा उत्तरवला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 4500 कोटींचा बोजा आला मात्र आम्ही तो सहन करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कार्य करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

कांद्याचा मुद्दा

कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अनेकांचे फोन आले. विरोधक कायम काहीतरी चुकीची माहिती देतात. मी धनंजयला दिल्लीला जायला सांगितले. धनंजय गेला आणि जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती केली. त्यावर अमित शाह यांनी तात्काळ 2 लाख मेट्रिक टन कांदा 24 रुपये प्रतिकिलो रुपयाने खरेदी केला.

शेतकरी हीच माझी जात

मी देखील शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. शेतकरी हीच माझी जात आहे. शेतात पाणी आल्याशिवाय शेती होत नाही. जलसंपदा मंत्री असताना खूप कामं केले”, असं अजित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली