ताज्या बातम्या

'...मोदींशिवाय पर्याय नाही' भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published by : shweta walge

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत 'आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं' असं भाजपच्या विजयानंतर म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, नको तेवढा आत्मविश्वास दाखवण्याचा काहींचा प्रयत्न. मोदींमुळे भारताची प्रतिमा उंचावली. मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. निकाल चांगला लागेल शाहांनी सांगितले होते. तीन राज्यातल्या जनतेने भाजपाला साथ दिली. शेवटी जनतेचा कौल महत्वाचा त्यांना पाहिजे तेच होते. EVMमध्ये घोटाळा झाला असं विरोधक बोलतील आर्श्चय वाटायला नको. पंजाबमध्ये आप आलं EVMघोटाळा झाला का? निकाल मान्य करता आलं पाहिजे. भाजपाला चेहरा नरेंद्र मोदीच हे त्रिवार सत्य आहे.

पुढे ते म्हणाले की, कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजत पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याच काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करू नये.

शरद पवारांवर निशाणा साधला म्हणाले की, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...