Amit shah
Amit shah 
ताज्या बातम्या

'ती' कलावती कोण? अमित शहांची राहुल गांधींवर जोरदार टीका

Published by : shweta walge

मणिपूरच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अविश्वास प्रस्तावावर

पंतप्रधान मोदींचे कौतुक

दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. मोदी 17-17 तास काम करणारे पंतप्रधान असून, मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली असं अमित शाह म्हणाले आहेत.

अविश्वास प्रस्ताव आणि राजकारण

अविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तु्म्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे उभा आहे. तर या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावर

मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चा तयार आहे पण विरोधक या मुद्द्यावर चर्चा होऊ देत नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच मणिपूरची घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसनंतर अर्थव्यवस्था सुधारेल की नाही, याबाबत देशात शंकेचे वातावरण होते. मनमोहन सिंगांच्या काळात सर्व ग्राफ उलटे होते, सर्व पॅरमीटरची धज्जी उडाली होती. क्रमांकावर आणली.

अमित शाहांचा राहुल गांधीवर निशाणा

सभागृहात अशी एक व्यक्ती आहे त्यांना तब्बल तेरा वेळा राजकाणात लाँच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेराही वेळा हा प्रयत्न फेल गेला. त्यांचे एक लाँचिंग माझ्या समोरच झालेले आहे. त्यापूर्वी त्यांनी बुंदेलखंड येथे कलावती नावाच्या महिलेच्या घरी जेवण केले होते. जेवणानंतर त्यांनी सभागृहात त्यांनी गरिबीचे ह्रदयद्रावक शब्दात वर्णन केले. यानंतर त्यांचे सरकार सहा वर्षे होते. मात्र त्या कलवतीनचे काय झाले? त्या महिलेच्या जेवणाचा, घराचा, रोजगाराचा प्रश्न मिटला की नाही, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्या कलावतीलाही नरेंद्र मोदींच्या काळात सर्व काही मिळाले. ती कलावतीही मोदींनाच साथ देत आहे."

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...