Anil Bonde - Amol Mitkari Team Lokshahi
ताज्या बातम्या

"अनिल बोंडेसारख्या..."; भाजपने उमेदवारी दिल्यावर अमोल मिटकरी भडकले

भाजपने आज राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (Shivsena) उमेदवार जाहिर केल्यानंतर भाजपनेही (BJP) अखेरीस नावांची गुपिते उघडली आहेत. महाराष्ट्रातून भाजपाकडून पियूष गोयल (Piyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप तिसरा उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. यामुळे विधानसभेची लढत रंगणार असे दिसत आहे.

अनिल बोंडेंसारख्या व्यक्तींना राज्यसभेवर पाठवून भाजपला काय सिद्ध करायचंय असा सवाल अमोर मिटकरींनी उपस्थित केला. "अनिल बोंडे यांनी काही दिवसांपूर्वीच बोंडे यांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली होती. तसंच नाना पटोलेंचा पंजा छाटण्याबद्दल देखील ते बोलले होते. हिजाब वादावर बोलताना त्यांनी हातावर हात धरून बसलात तर तुमच्या मुलींना हिजाब घालावा लागेल असं म्हटलं होत, तहशीलदारांना झालेल्या मारहाण प्रकरणात ते सापडले होते. भाजप स्वत:च्याच पायावर धोंडा मारुन घेत असून, निष्ठावंतांना डावलून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. भाजप बदल रहा है असं ऐकलं होतं. मात्र भाजप एवढा बदलतोय हे अनिल बोंडेंच्या उमेदवारीने सिद्ध झालं. तसंच अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजप राज्यातील वातावरण ढवळून काढणार हे निश्चित" असं अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपनेही दोन उमेदवारांची नावे जाहिर केली आहेत. परंतु, भाजप राज्यसभेसाठी तिसराही उमेदवार देणार असल्याची चर्चा असून या जागेसाठी धनंजय महाडिक उद्या भरणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी लोकशाही न्यूजला दिली आहे. यामुळे शिवसेना-भाजप थेट लढत होणार असल्याने सर्वांचेच डोळे याकडे लागले आहेत. देशभरात 57 जागांसाठी होत आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 20 जागांवर भाजपला विजया होईल, असा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर