Amravati Team Loksahi
ताज्या बातम्या

राणा दाम्पत्याचं स्वागत जल्लोषात, मात्र कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Amravati : रवी राणा आणि नवनीत राणा काल महिनाभरानंतर अमरावतीमध्ये पोहोचले.

Published by : Sudhir Kakde

अमरावतीत | सुरज दाहट : गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य (Navneet Ravi Rana) हे सतत वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट, त्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, जेल वारी, लीलावती रुग्णालय अशा महिनाभराच्या प्रवासानंतर राणा दाम्पत्य काल आपल्या मतदारसंघात म्हणजेच अमरावतीमध्ये (Amravati) पोहोचले. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठा राडा सुद्धा झाला. स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या गर्दीमुळे परिसरात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर आता राणा दाम्पत्य पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

राणा दाम्पत्याच्या स्वागत रॅलीमध्ये आमदार रवी राणांच्या तीन कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. स्वागत रॅलीमुळे मालवीय चौक ते राजकमल चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या कार्यकर्त्यांवर कलम 188, 283, 34 अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. बाळासाहेब इंगोले, मनोजकुमार नवल किशोर आणि सुशील लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. जल्लोष मिरवणुकीत हार अर्पण करण्यासाठी विनापरवाना क्रेन वापरल्याप्रकरनीही गुन्हे दाखल झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा