ताज्या बातम्या

Amruta Fadanvis : फडणवीसांना पत्नीकडून वाढदिवसाच्या जिलेबी भरवत शुभेच्छा...

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या राजकीय नाट्यात अनेक अंक समोर आले होते. दरम्यान आज राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज ५२ वा वाढदिवस आहे. त्यांना राज्यातूनच नाही तर देशभरातून शुभेच्छा येत आहेत. तसेच, त्यांना त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस ( Amruta Devendra Fadnavis ) यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशम मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसह अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या या हटके ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणंही तसेच आहे. अमृता फडणवीस यांनी या फोटोला जे कॅप्शन दिलंय ते वाचून आता नेटकरी देवेंद्र फडणवीस आणि जिलेबीतील साम्य शोधू लागले आहेत.

पाहा अमृता फडणवीसाचं कॅप्शन

"जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !"

नेत्यांकडून फडणवीसांना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुंबईतील निवासस्थान सागर बंगल्यावर नेत्यांची सकाळपासूनच ये-जा सुरु आहे. आमदार प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर, शिंदे गटातील आमदारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती