ताज्या बातम्या

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोट येथे काळं फेकण्याची घटना घडली.

Published by : Team Lokshahi

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोट येथे काळं फेकण्याची घटना घडली. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी ते अक्कलकोटमध्ये आले असताना ही घटना घडली.

शिवधर्म फाऊंडेशन आणि शिवभक्त कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर काळं फासल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे शिवधर्म फाऊंडेशन आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे.

तसंच, त्यांनी स्वामी समर्थ यांचाही एकेरी उल्लेख करून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचं शिवधर्म फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. याच कारणामुळे यापूर्वी संघटनेने संभाजी ब्रिगेडविरोधात उपोषण देखील केलं होतं.

दरम्यान, आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच कार्यक्रमादरम्यान ही संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि त्यांना काळं फासण्यात आलं. पोलीस प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Railway : रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवणार; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Latest Marathi News Update live : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Mumbai Arthur Road Jail : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात हाणामारी