Ganesh Naik Team Lokshahi
ताज्या बातम्या

गणेश नाईक यांना अटक करा; रुपाली चाकणकरांचे पोलिसांना निर्देश

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना हे निर्देश दिले आहेत.

Published by : Sudhir Kakde

भाजपनेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना अटक करण्याचे निर्देश रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) दिले आहेत.

गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे खळबळजनक आरोप या महिलेने केले आहे. तसेच गणेश नाईक यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे.

दरम्यान, सध्या मुलाच्या शिक्षणाच्या व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा लावल्याने गणेश नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. संबंधित पत्र महिलेने राज्य महिला आयोगाला पाठवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य