मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने (Arun Gawli) पॅरोल मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे डॉन अरुण गवळी यांनी ही रजा मागितली आहे. अरुण गवळीने रजा मिळविण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता, मात्र तो अर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्याने आता नागपूर खंडपीठात धाव घेतली.
अरुण गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, या कारणामुळे हा अर्ज करण्यात नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गवळीने याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २९ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.