शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेने बच्चू कडू यांनी राज्यभ चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. आज, 24 जुलै रोजी हे चक्काजाम आंदोलन पार पडणार असून यामध्ये दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार आदी सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत हे आंदोलन होणार असून आपापल्या गाव, तालुका, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांवर चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी दिले आहेत.
बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनला खासदार प्रणिती शिंदे, आमदार सत्यजित तांबे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार प्रकाश सोळंके, खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल पाटील आदींसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर-प्रतिनिधींनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सातबारा कोरा करा, हे आंदोलन केले आहे.
हेही वाचा