ताज्या बातम्या

डिसेंबरमध्ये बँका राहणार तब्बल 13 दिवस बंद...

Published by : Siddhi Naringrekar

डिसेंबर महिना हा ख्रिसमससाठी महत्वाचा मानला जातोच तसेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठीसद्धा महत्वाचा असतो. या निमित्ताने बँकांनादेखील सुट्ट्या असतात. डिसेंबर महिन्यात बँकांना एकूण 13 दिवस सुट्टया असणार आहेत. या 13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक महिन्याप्रमाणे शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील. मात्र या सुट्ट्या अनेकवेळा त्या त्या राज्यानुसार दिल्या जातात. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवतात. डिसेंबरमधील पहिली सुट्टी 3 डिसेंबर ला असणार आहे.

देशातील बँकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निश्चित करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती अशी विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या असतात. ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो.

3 डिसेंबरनंतर 4 डिसेंबरला रविवारची सुट्टी आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकेला दोन दिवस सुट्टी असणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरलाही देशातील काही भागात बँका बंद राहतील. 18 डिसेंबर रविवार आणि 19 हा गोवा मुक्ती दिन आहे. 24, 25 आणि 26 डिसेंबर या दिवशी ख्रिसमसच्या सणानिमित्त राज्यांनुसार सुट्टी असणार आहे. तर 29, 30 आणि 31 डिसेंबरला सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यातील 29 तारखेला गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त, 30 तारखेला यू कियांग नांगबाह आणि 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील. सलग दिवस बॅंका बंद राहणार असल्यामुळे बॅंकिंगच्या कामाचे नियोजन ग्राहकांना करावे लागणार आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी