Bank
Bank Team Lokshahi
ताज्या बातम्या

बँकांची कामे आताच करा, कारण पुढील आठवड्यात एवढे दिवस सुट्टी

Published by : Saurabh Gondhali

येत्या आठवड्यामध्ये बँकांना (bank)चार दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमचे जर काही काम असेल तर त्याकरता कदाचित तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते, किंवा आठवड्याच्या सुरुवातीच्या एक-दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे बँकेमध्ये काम करून घ्यावे लागेल. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये त्या त्या सणाला बँकांना सुट्टी असतात. येत्या आठवड्यातील सुट्ट्यांमध्ये रविवारचा देखील सामावेश आहे. येत्या आठवड्यामध्ये 14, 15, 16, आणि 17 या तारखांना बँकेला सुट्टी असतील. त्यामुळे तुमचे जर काही काम असेल तर ते आधीच करून घ्या, अन्यथा चार दिवस तुम्हाला वाट पहावी लागेल. (Banks will remain closed for four days)

१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ तामिळ नववर्ष/ चैरोबा, बिजू उत्सव/ बोहर बिहू.

रिझर्व बँक ऑफ इंडिया या मध्यवर्ती बँकेने या सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांच्या संदर्भात काही गाईडलाईन्स दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी या सुट्ट्यांची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काम असेल, तर या काळात तुम्ही तुमचे बँकिंग काम नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे करु शकता.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण