सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारी करत असते. थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करण्यात येते. खास मद्यपार्ट्यांचे आयोजन हॉटेल्स, क्लब यांच्याकडून करण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर आता थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये पोलीस सज्ज झाले आहेत. 29 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून 102 अधिकारी आणि 625 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
मद्याची दुकाने पहाटे उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. थर्टी फर्स्टला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.