A Shocking incident in Beed : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची प्रसुती झाल्यानंतर जन्मलेलं बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बातमी ऐकल्यानंतर नातेवाईकांनी बाळाच्या आपल्या गावी घेऊन जाऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
अंबाजोगाईतमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात संतापजनक प्रकार घडला आहे. केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबातील महिलेची प्रसुती झाल्यानंतर बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नातेवाईकांनी बाळ घेऊन आपल्या गावी गेले, त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी केली, ही तयारी सुरु असतानाच बाळ रडू लागले. क्षणाचाही विलंब करता नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालय धाव घेत बाळाला आसीयूमध्ये दाखल केले. या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला? यामध्ये दोषी कोण? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
हेही वाचा...