Heavy Rain in Belgavi Team Lokshahi
ताज्या बातम्या

बेळगावला अवकाळीनं झोडपलं; झाड पडल्यानं वाहनं चक्काचूर

Heavy Rain in Belgavi : शहरातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Published by : Sudhir Kakde

बेळगाव प्रतिनिधी | नंदकिशोर गावडे : बेळगावला (Belagavi) आज अवकाळी पावसाचा (Heavy Rain) जोरदार तडाखा बसला. शहरात अनेक भागांत झालेल्या पावसानं मोठा हैदोस घातला. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरातील अनेक झाडं कोसळली. यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.

Heavy Rain in Belgavi

वादळी पावसात अनेक झाडं कोसळली. यामध्ये 25 दुचाकी झाडांखाली दबल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. बेळगाव मधील सिव्हिल हॉस्पिटल रोड वरील ही घटना घडली.

पाऊस व वारा सुरु असताना अचानक रस्त्यानजिक असणारं झाड कोसल्याने जवळपास 25 ते 30 दुचाकीचं नुकसान झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य