सध्या गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात महिला अत्याचाराच्या अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या. महाराष्ट्रातील बदलापूरातील दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता सायन कोळीवाड्यातील एक अत्याचाराची बातमी समोर आली आहे. काल रात्री सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला.
याचपार्श्वभूमीवर नुकतीच सायन कोळीवाड्यातील एक घटना देखील समोर आली होती ज्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी ट्वीटद्वारे त्या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. ज्यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधमाने अत्याचार केला. ही घटना घडली असता आता भांडुपमधील एका शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोपाल गौडा वय २७ असे या तरुणाचे नाव असून शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टचे मेंटेनन्सचे काम करत होता. त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान तिथे पाचवी इयत्तेच्या मुली योगा क्लासेससाठी आल्या होत्या, त्यावेळी गोपालने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.
या तिघी गोपालच्या वर्तनाने घाबरल्या आणि त्या तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या. या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गवडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोपाल याला दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर या घटनेचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.