ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन, जिल्हाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

Published by : shweta walge

भूपेश बारंगे,वर्धा : वर्धा येथे दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध दालने व सभा मंडपांच्या उभारणीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलन आयोजन समितीचे सदस्य तथा संमेलनानिमित्त गठीत करण्यात आलेल्या विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात संमेलन होत असून त्यानिमित्त मैदानावर मुख्य सभामंडप, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळे सभामंडप उभारण्यात येणार आहे. याशिवाय राज्यासह देशभरातून विविध प्रकाशनांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनांची दालने राहणार असून त्याची उभारणी देखील केली जात आहे. यात काही दालने शासकीय कार्यालयांची देखील असणार आहे. या सर्व मंडपांच्या उभारणीचा शुभारंभ आज करण्यात आला.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...