sex racket|prostitution team lokshahi
ताज्या बातम्या

पॉश भागात सुरू होते सेक्स रॅकेट, पोलीस अचानक पोहोचले आणि मग...

घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती

Published by : Shubham Tate

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटचा खुलासा करताना पोलिसांनी चार महिला आणि दोन तरुणांना अटक केली आहे. हा व्यवसाय चालवणाऱ्या ऑपरेटरचीही पोलिस चौकशी करत आहेत. प्रकरण शहरातील गुदरी बाजारचे आहे. याठिकाणी देहविक्रीचा धंदा चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. पोलिस छापा टाकण्यासाठी तेथे पोहोचले तेव्हा परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले. (bihar police busted sex racket in samastipur two people detained)

शहरातील गुदरी बाजार परिसरात अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेटचा धंदा सुरू होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक चांगलेच संतापले. एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती शनिवारी कोणीतरी पोलिसांना दिली.

या माहितीवरून तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला असता घटनास्थळावरून चार महिला आणि दोन तरुणांना हा व्यवसाय केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून रणजीत सिंह नावाचा व्यक्ती सेक्स रॅकेटचा व्यवसाय चालवत होता. समस्तीपूरमधील गुदरी बाजार हा परिसर अत्यंत पॉश मानला जातो. नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ अरुण कुमार राय आरोपींची चौकशी करत असून, त्यानंतरच या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होईल. मात्र, पोलिसांच्या या छाप्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा