Harbhajan Singh|Sreesanth
Harbhajan Singh|Sreesanth team LokshahiLive

14 वर्षांनंतर हरभजनने मान्य केली चूक

त्या दिवशी जे काही घडले ते माझे चुकले
Published by :
Shubham Tate
Published on

Harbhajan Singh : IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने श्रीशांतला मुसकाडीत मारल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. या घटनेला 14 वर्षांनंतर माजी भारतीय ऑफस्पिनरने आपली चूक मान्य केली आहे. या घटनेबद्दल खेद व्यक्त करताना तो म्हणाला की, मी श्रीशांतला मुसकाडीत मारायला नको होती. त्या दिवशी जे घडले ते भयंकर चुकीचे झाले. (harbhajan singh sreesanth together revelations ipl scuffle between players glance live fest)

हरभजन सिंग पुढे म्हणाला की, खेळात नेहमीच तणाव असतो, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्या दिवशी जे काही घडले ते माझे चुकले. त्या हंगामात हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता, तर श्रीशांत युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता.

Harbhajan Singh|Sreesanth
मास्क सक्तीबाबत सरकार आणि प्रशासनात गोंधळ; अजित पवार म्हणाले, मी स्पष्ट...

संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती

श्रीसंतला मुसकाडीत मारल्याप्रकरणी हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय हरभजनवर 5 एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हरभजन सिंगने याआधीही अनेक वेळा आपली खंत व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, श्रीसंतने खूप नौटंकी केली होती. पण मी असे करू नये, ही माझी चूक होती. तो पुढे म्हणाला की, मी मैदानावर केलेली कारवाई पूर्णपणे चुकीची होती. मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे.

श्रीशांतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 169 विकेट घेतल्या

27 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, श्रीशांतने भारतासाठी 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीशांतच्या नावावर 169 विकेट आहेत. विशेष म्हणजे 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा श्रीशांत भाग होता. याशिवाय 2011 मध्ये भारतीय संघाने 50 षटकांचा विश्वचषक जिंकला तेव्हाही श्रीशांत भारतीय संघाचा भाग होता. या माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या 44 सामन्यांमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com