थोडक्यात
दिल्ली लाल किल्ला परिसरात स्फोट
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अॅक्शन मोडमध्ये
(Amit Shah) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कसा झाला? याचा तपास आता घेतला जात आहे.
काल अमित शाह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर आता अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत असून आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत अमित शाह अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.