2026 पासून सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोनदा बोर्ड परीक्षा देता येईल. नवीन योजनेनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याने फेब्रुवारीच्या मध्यात होणाऱ्या पहिल्या परीक्षेत बसणे आवश्यक आहे. तर ज्यांना त्यांचे गुण सुधारायचे आहेत किंवा तीन विषयांमध्ये कमी पडत आहेत, ते मे महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत बसू शकतात, असा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी केली. पहिला टप्पा अनिवार्य, दुसरा टप्पा पर्यायी असून सर्वोत्तम गुण राखले जातील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा