मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज, सोमवारी सकाळी अपघात घडला असून यात 13 जण रेल्वेतून खाली पडले असून त्यातील 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दोन लोकल एकमेकांना घासल्यामुळे हा अपघात घडल्याचेन त्यांनी सांगितले. एक रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती, तर दुसरी लोकल ही कसाराच्या दिशेने जात होती. यावेळी रेल्वे डब्याच्या दारात लटकलेल्या प्रवाशांमध्ये टक्कर झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. हे प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. या अपघातातील जखमींना कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहितीदेखील यावेळी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा