Team Lokshahi
Team Lokshahi
ताज्या बातम्या

सैराट फेम 'प्रिन्स'च्या करामती, अभिनेता सुरज पवारच्या मागावर पोलीस, मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Published by : Team Lokshahi

शुभम शिंदे (अँकर, बुलेटिन प्रोड्युसर) : सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्स आता चर्चेत आलाय. सैराट चित्रपटचा शेवट सर्वांना माहितीय. या चित्रपटात प्रिन्स हा आर्ची आणि परश्याचा खून करतो आणि चित्रपट संपतो. मात्र त्यावेळी चित्रपटात त्याला अटक होत नाही मात्र आता ह्याच प्रिन्सचा पोलीस खरोखर शोध घेताय. कारण हा प्रिन्स म्हणजे अभिनेता सुरज पवार ह्याला अटक होणार आहे. कारण या सुरज पवारच्या काही करामती समोर आल्यात.

प्रिन्स म्हणजे सुरज पवार याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांकडे तक्रार आल्यांनतर पोलीस आता सुरज पवारचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला अटक देखील होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावातील महेश वाघडकर या तरुणाची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक करण्यासाठी चक्क भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला होता.

मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून 2 जागा रिक्त झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात 2 अधिकाऱ्याचीं मयत झाले असून त्या जागा तत्काळ भरायच्या आहेत असा बनाव करत श्रीरंग कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर या तरुणाला फोन करून मंत्रालयात मोठ्या पदाच्या नोकरीचं आमिष दाखवले. यासाठी 5 लाख रुपये लागतील असं त्या व्यक्तीने वाघडकर यांना सांगितलं. मंत्रालयात नोकरी लागते म्हणून वाघडकर हे देखील तयार झाले. 5 लाख रुपयांपैकी 2 लाख आधी आणि 3 लाख काम झाल्यावर द्यायचे असं या दोघांमध्ये ठरलं. 4 सप्टेंबर 2022ला या दोघांमध्ये तोंडी करार झाला. ठरल्याप्रमाणे वाघडकर यांनी 2 लाख रुपये दिले. त्यानंतर 9 सप्टेंबर 2022 रोजी तुमचे नियुक्तीपत्र घेऊन राहुरी विद्यापीठ येथे येणार असल्याचं सांगितलं. त्या दिवशी तोतया श्रीरंग कुलकर्णी राहुरी विद्यापीठाच्या विश्रामगृहावर थांबला. त्याच्याकडे काही बनावट ओळखपत्रही होते.

महेश वाघडकर यांना त्या व्यक्तीविषयी संशय आल्याने सावध होत सोबत आणलेले 3 लाख रुपये देणे टाळले आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तो श्रीरंग कुलकर्णी नसून दत्तात्रय क्षीरसागर ( मालेगाव, नाशिक ) हा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास केला असता. या प्रकरणाचे धागेदोरे सैराट फेम प्रिन्स म्हणजे अभिनेता सुरज पवारपर्यंत पोहोचलेत. त्यानंतर या प्रकाराचं संगमनेर कनेक्शन समोर आले, कारण सुरज पवारने या कारामतींसाठी लागणारे बनावट शिक्के संगमनेरात बनवल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवणे, फसवणूक, भारतीय राजमुद्रेचा गैरवापर आणि बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्र तयार करणे यानुसार गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केलीय. आणि आता अभिनेता सुरज पवारचाही पोलीस शोध घेत आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल