मविप्र समाजाच्या वतीने काल समाज दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान केलं होतं. यावरच बहुजन समाजातील मुलामुलींसाठी अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. म्हणून आजच्या मुला मुलींनी अशा महापुरुषांना पुजले पाहिजे. हे आमचे देव आहेत, याची पूजा आपण करायला पाहिजे, यात गैर काय? हे आजही बोललो, यापूर्वीही बोललो होतो आणि आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्ही सामील झालो, म्हणजे मी माझी भूमिका बदलेल, असं होणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
ते म्हणाले की, आमच्या अनेक महाविद्यालयात जशा शाखा आहेत, त्यानुसार शिक्षण महर्षींच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. ज्यांनी मुला मुलींना शिक्षण प्रवाहात आणलं, त्यांना पुजलं पाहिजे. यात कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे भुजबळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त गेलो असताना तिथे रावसाहेब थोरात यांच्यापासून ते वसंतराव पवार यांच्यापर्यंत फोटो होते. मी नेहमीच सांगत आलोय की, आपल्याला शिक्षणाची कवाडे ही सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, फातिमाबी शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात अशा अनेक महापुरुषांनी खुली करून दिली आहेत. हे आमचे देव आहेत, याची पूजा आपण करायला पाहिजे यात गैर काय? हे आजही बोललो, यापूर्वीही बोललो होतो. आणि आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्ही सामील झालो, म्हणजे मी माझी भूमिका बदलेल असं होणार नाही. फुले शाहू आंबेडकरांची भूमिका बदलणार नाही.
छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुलेंना भिडेंनी वाडा दिला, म्हणून शाळा सुरू झाली. महात्मा फुलेसोबत चिपळूणकर, कर्वे होते. पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण घेता येत नव्हते, त्यावेळी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, यावर ऐतिहासिक पुराव्याद्वारे चर्चा करता येईल. म्हणून मी हे मांडलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.