थोडक्यात
मुख्यमंत्र्यांकडून माढ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांला तातडीची मदत करणं गरजेच
“जवळपास 2 हजार कोटी काल आम्ही रिलीज केले. शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत, पण ज्यांच्या घराचं त्यासोबत नकुसान झालेलं आहे. अन्नधान्याच नुकसान झालय, मदत त्यांनाही करणार आहोत. हा निर्णय शासनाने केलेला आहे की,अधिकचे निकष कुठलेही न लावता निकष आवश्यकतेनुसार शिथिल करुन नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. नागरिकांना नियमांवर बोट न ठेवता , शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) असं म्हणाले. आज माढ्यामध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली.
‘पैसा रिलीज करणं आपत्ती सुरु असताना सुरु केलेलंआहे. आम्ही सर्वांना दिवाळीपूर्वी मदत करणार आहोत’ देवेंद्र फडणवीस यांनी असं आश्वासन दिलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, फडणवीस त्यावर म्हणाले की, “बोली भाषेतली ओला दुष्काळ टर्म आहे. जे नुकसान पावसामुळे झालय त्या सर्वाची नुकसानभरपाई, टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“तातडीची पहिल्यांदा मदत हा विषय महत्वाचा आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. केंद्र सरकारही मदत करणार आहे. एनडीआरएफला काही एडवान्स पैसे दिलेले असतात. ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो काही निधी लागेल, तो देण्याच आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
काही ठिकाणी पाऊस हा ढगफुटीसारखा
काही ठिकाणी पाणी अचानक सोडल्यामुळे नुकसान झालं, त्या प्रश्नानावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. “काही ठिकाणी पाऊस हा ढगफुटीसारखा कोसळला. त्यामुळे नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं. या संदर्भात कोणी काही चूक केलीय का हे तपासू. पाऊस असा झाला की, रेग्युलेट फ्लो शक्य नव्हता. अनरेग्युलेटेड कॅचमेटमध्य ढगफुटीसारखा पाऊस झाला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्याला तातडीची मदत करणं गरजेच
“निर्सगाच चक्र बदलेलं आहे. वातावरण बदलाचा परिणाम या ठिकाणी होत आहे. आपण याकडे लक्ष देणं गरजेच आहे. खरडून गेलेल्या जमिनी संदर्भात काही नॉर्म्स आहेत. अधिकचे पैसे देणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत करणं गरजेच आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.