जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाही दु:ख झालं असल्याचं म्हटलं आहे. सोबतच 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मी तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठिक नाही. आपण चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी उपोषण केलं, असं सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 5 महत्त्वाच्या घोषणा
1. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
2. डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत,
3.अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल,
4. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल,
5. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची घोषणाही
विरोधकांना टोला
कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू झाले आहे. आता सगळे ज्योतिषी बंद झाले. सरकार पडता पडता, अजितदादा आमच्यासोबत आले. आता म्हणतात, मुख्यमंत्री बदलणार. मी काय तुमचं घोडं मारलंय? जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही, असंही ते म्हणाले.