cm - pm  Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच मंचावर

शिवसेना (ShivSena) आणि भाजपचे (BJP) राज्यातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले असताना उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आज (14 जून) एकाच मंचावर दिसणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना (ShivSena) आणि भाजपचे (BJP) राज्यातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले असताना उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आज (14 जून) एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे आज (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.

एप्रिल महिन्यात लता मंगेशकर फाऊंडेशन (Lata Mangeshkar Foundation) पुरस्कार घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं होतं. मात्र राजभवनात आज दुपारी चार वाजता क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये (Dehu) आहे. संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे.

या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये (Dehu) आहे. संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे.

या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप