ताज्या बातम्या

Amarnath Cloudburst : अमरनाथमध्ये ढगफुटी ; पुण्यातले दोन भाविक बेपत्ता

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath cloudburst) गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

Amarnath Yatra : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath cloudburst) गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. ही घटना काल संध्याकाळी 5.30 वाजता घडली. या दुर्घटनेनंतर (Amarnath Rain) अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे. पुण्यातील धायरी भागात राहणारे महेश भोसले आणि सुनीता भोसले हे अमरनाथ यात्रेत अडकले आहेत. अद्याप तिथल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

अमरनाथ इथं गुहेजवळ ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे. पुण्यातील धायरी भागात राहणारे महेश भोसले आणि सुनीता भोसले हे अमरनाथ यात्रेत अडकले आहेत.

आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय. पुण्यातील दोन भाविक अमरनाथ यात्रेत अडकल्याचं कळतंय. पण, अद्याप तिथल्या प्रशासनानं ह्या माहितीला दुजोरा दिलेला नाहीय. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी पथकाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळालीय. तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळालीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज