Truck Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

VIDEO : कंटेनर पार्किंग करताना झाली छोटीशी चूक; चालकाचा जागीच मृत्यू

जळगावमध्ये कंटेनरचा डीपीला धक्का लागल्यानं हा अपघात घडला.

Published by : Sudhir Kakde

जळगाव प्रतिनिधी | मंगेश जोशी : गाडी पार्क करत असताना अनेकदा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचे आपण पाहतो. अशीच एक घटना जळगावमधून समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील खेडी परिसरातील पेट्रोल पंपावर कंटेनर पार्क करत असताना झालेल्या अपघाताचा व्हिडिओ (Jalgaon Truck Accident Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कंटेनर पार्क करत असाना ते डीपीला धडकल्याने डीप चा स्फोट झाला. यावेळी वीज प्रवाह कंटेनरमध्ये उतरून विजेचा जोरदार धक्का लागल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. जगदीश सिंह बोरा असं या ठार झालेल्या कंटेनर चालकाचं नाव होतं.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. चालकाच्या खिशातील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात हलवला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा