Dombivli Shiv Sena team lokshahi
ताज्या बातम्या

डोंबिवली शिवसेना शाखेत वाद विकोपाला, चोरीच्या आरोपावरून शहर प्रमुखाला अटक

कल्याण डोंबिवलीत वादामुळे राजकारण तापले

Published by : Team Lokshahi

Dombivli Shiv Sena : तुम्ही कोणत्या गटात आहात, या कारणावरून डोंबिवलीत एका शाखेत जोरदार वाद झाला. या वादानंतर शाखेतून कागदपत्र आणि पैसे चोरीच्या आरोपावरून शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुले या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेत झालेल्या वादामुळे राजकारण तापले आहे. (Controversy breaks out in Dombivli Shiv Sena branch, city chief arrested on charges of theft)

शुक्रवारी संध्याकाळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर श्याम चौगुले आणि इतर दोन लोक डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत पोहोचले. शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे बसले होते.

परेश म्हात्रे यांचा आरोप आहे की, विवेक खामकर यांनी शाखेत येऊन आम्हाला विचारले तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही कोणत्या गटात आहात. मी त्यांना सांगितले अजून मी शिवसेनेत आहे. कोणत्याही गटात गेलो नाही.

यानंतर खामकर आणि त्यांची लोक शाखेबाहेर आले असता, शाखेवर लावण्यात आलेला बॅनर बघून विवेक खामकर हे संतापले. या बॅनरवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी मंत्री आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे सह इतर शिवसेनेच्या नेत्यांच्या फोटो होता.

हे फोटो बघून खामकर यांनी पवन मात्रे यांना दमदाटी करत बॅनर फाडला. एवढेच नाही तर शाखेत असलेल्या काही महत्त्वाची कागदपत्र आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले. या प्रकारानंतर परेश मात्रे यांनी डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आपल्या सोबत घडलेल्या परेश यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख खामकर आणि त्यांचे साथीदार श्याम चौगुले या दोघांना अटक केली. दोघांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मी खामकर यांच्यावर परेश मात्रे लावलेल्या आरोप मध्ये काय तथ्य आहे का याचा तपास पोलीस करतील. पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, शिवसेनेत झालेल्या या वादावादी आणि पोलिसांकडून शहर प्रमुख वाला अटक झाल्यानंतर राजकारण तापले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा