ताज्या बातम्या

गोविंद बायोमेडिकलच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार नगरसेविका संध्या तेरसे

Published by : shweta walge

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : नेरूर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये गोविंद बायो मेडिकल हा प्रकल्प अनधिकृतपणे सुरू आहे. आणि त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. या अनधिकृत असलेल्या प्रकल्पाबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका व भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांवर गेल्यावर त्या ठिकाणी प्रकल्पाचे एकही अधिकारी उपलब्ध झाले नाही. मात्र प्रकल्पावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर असलेली दुर्गंधी उपस्थितांना सहन करावी लागली.

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे गेले अनेक वर्ष गोविंद बायो मेडिकल हा प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी रुग्णालयांमध्ये असलेला टाकावू कचरा यावर प्रक्रिया तसेच हा कचरा नामशेष करण्याचा प्रकल्प थाटण्यात आलेला आहे. मात्र याला कोणत्याही प्रकारे परवानगी शासनाची नाही. त्याचप्रमाणे नेरूर एमआयडीसी येथे सुद्धा हा प्रकल्प करण्यात आला आहे. हे दोन्ही प्रकल्प नेरूर गावाच्या हद्दीत आहे. दरम्यान याबाबत कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेविका व भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे याबाबत संबंधित कंपनीशी चर्चा केल्यानंतर हे प्रकल्प अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र कोणीही या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही. अनधिकृतपणे या ठिकाणी रुग्णालयांमधील कचरा टाकून हवेत प्रदूषण करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागणार आहे. तसेच प्रकल्पासाठी दिलेली जमीन सुद्धा नापीक होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

तर नेरूर येथे प्रकल्प असलेल्या जमिनीचे मालक प्रदीप नाईक यांनी सांगितले की, हा प्रकल्प बंद करण्यासंदर्भात संबंधित कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे. असे असताना सुद्धा त्यांनी हा प्रकल्प सुरू ठेवलेला आहे. यापुढे ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी केली जाणारा आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाकाऊ कचरा येत होता आता मात्र इतर जिल्ह्यातीलही टाकाऊ कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करावा अशी आम्ही मागणी केली आहे. असे सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे रूपेश कानडे, सचिन तेंडुलकर, रुपेश बिडये, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश परब, राजीव कुडाळकर, अशोक कंदुरकर, अभय सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका संध्या तेरसे यांनी सांगितले की, एमआयडीसी क्षेत्रामध्ये गोविंद बायोमेडिकल यांचा प्रकल्प ज्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्या प्रकल्पाच्या बाजूला नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प होणार होता मात्र या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच नेरूर ग्रामस्थांनी विरोध केला आता घनकचऱ्यापेक्षा प्रदूषण निर्माण करणारा रुग्णालयातील टाकाऊ कचरा प्रकल्प उभा राहिला तरी नेरुर येथील कोणीही विरोध केलेला नाही यामागे नेमकं कारण काय याला कोणाचा वरदहस्त आहे हे उघड होणे.

मुंबईतील स्थानिक अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Daily Horoscope 15 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मिळणार शुभ संकेत; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना