ताज्या बातम्या

Navratri 'Garbo' Song: आता पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या 'या' गाण्यावर होणार दांडिया !

Published by : shweta walge

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. यावेळी त्यांनी लेखनात आपला हात आजमावत एक गरबा गाणे लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी नवरात्रीच्या निमित्ताने हे गरबा गाणे लिहिले आहे. तर या गाण्याला लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशाली हीने आवाज दिला आहे तर तनिष्क बागचीचेने सुर दिले आहेत.

'गारबो' या गाण्याची निर्माती जॅकी भगनानीने केली आहेत. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे रिलिज करताना यूट्यूब चॅनलने लिहिले की, 'पीएम मोदींनी लिहिलेल्या गाण्यासोबत 'गारबो'मध्ये पहिल्यांदाच तनिष्क बागचीच्या सूर आणि ध्वनी भानुशालीच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे.

गुजरातमध्ये नवरात्रीला वेगळचं महत्व आहे. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि गरबा खेळण्याची परंपरा जपली जाते. हाच गुजरातच्या संस्कृतीचा अभिमान आणि वारसा नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्यातुन सांगण्यात आला आहे.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...