लाडक्या बहीणी संदर्भात निधी नसताना ही घोषणा केली आणि लाडकी बहीण योजने संदर्भात सरकारचे वर्षभराचे काही नियोजन नाही. दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या खात्याचा निधी कट केला जातो आणि तो दिला जातो. लाडकी बहीण योजना चालू राहिला पाहिजे. महिलांना 2100 रुपये दिले पाहिजेत. मात्र सरकारने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करायला हवे. सरकार आता राज्याची लूट करत आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी हडपला आदिवासी विभागाचा निधी हडपला मला असं वाटतं हा अन्याय आदिवासी बांधवांवर.