ताज्या बातम्या

दीपक केसरकरांची राऊतांवर टीका, म्हणाले 'एवढं जरी राऊतांनी समजून घेतलं तर...'

राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीवरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. रेव पार्टीमध्ये सापाचं विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही?

Published by : shweta walge

राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीवरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. रेव पार्टीमध्ये सापाचं विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही?, असं म्हणाले होते. यावरच शिवसेनेचे नेते, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. वर्षा बंद करून राहणारे हे मुख्यमंत्री नाहीत. जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आहेत. एवढं जरी राऊत यांनी समजून घेतलं तरी खूप आहे, अशी टीका त्यांनी केली.

केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सर्व सामन्यासाठी खुले आहे. त्यामुळे गणरायाची आरती कोणीही करावी. ज्याची पोलिसांकडे गुन्हेगार म्हणून नोंद आहे त्यांनाच पोलीस रोखू शकतात. संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांना एवढं ही समजू शकत नाही का अस स्क्रिनिंग करण शक्य तर असत का ? असा टोला केसरकर यांनी राऊत यांना लगावलाय.

पुढे ते म्हणाले की, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याची शपथ घेतली आहे. ते खोटी शपथ कधीच घेणार नाही. त्यांच्यासारखा जाज्वल्य मराठा समाजाचा दुसरा असू शकत नाही. त्यामुळे जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढीच जबाबदारी मराठा समाजाची आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आपण बीड सोडून कोठे जाणार नाही असे विधान केलय. त्यामुळे सकल मराठा समाज प्रतिनिधी, विधितज्ञ आणि छत्रपती राजे अशी एक सर्वसमावेशक कमिटी करून हा लढा लढला पाहिजे यातून तरच न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणालेत.


दरम्यान, सोशल मीडिया सेन्सेशन आणि बिग बॉस ओटीटी सीझन टूचा विनर एल्विश यादव नव्या वादात अडकलाय. नोएडा आणि दिल्ली एनसीआर भागात रेव्ह पार्टीचं आयोजन करण्याचा आरोप एल्विश यादवर आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एल्विशच्या या रेव्ह पार्टीत नशा येण्यासाठी चक्क सापाचं विष वापरलं जात असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी नोएडामध्ये ५ जणांना अटक केलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?