आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. पांडुरंगाला अभिषेक करत आरती संपन्न झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्राचीन असलेल्या प्रति पंढरपूर मंदिराची महती सांगितली. संत तुकारामांनी बांधलेलं हे मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी तसेच येथे येणाऱ्या भाविकांकरता सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध देणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच राज्यातील शेतकऱ्याला, बळीराजाला सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे, भरपूर पीक येऊ दे असं साकडं शिंदे यांनी विठुरायाकडे केल्यानं म्हटलं आहे. त्यासोबत वारी, लाडकी बहिण सर्वांनाच सुखी ठेवण्याची प्रार्थनाही त्यांनी यावेळी केल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी उपस्थित असून शिवसेने काही नेते, पदाधिकारीदेखील मंदिरात आल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा