पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर जी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, अहिल्यानगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निमंत्रण दिले होते, परंतू आणखीन कार्यक्रम असल्याने त्यांना उपस्थितीत न राहता येणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान यांना निमंत्रण केलं होतं मात्र आम्ही भेटलो त्यावेळी जन्मस्थळं आणि कर्मस्थळं येथे सभा घेण्याचं ठरवलं आहे. पुढच्या वेळेस नक्की येईल असा विश्वास पंतप्रधान यांनी दिला आहे. मध्यप्रदेशात अहिल्या होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लवकरच पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोन्ही दर्शनासाठी येणार आहे. 28 वर्ष राज्यकारभार त्यांनी चालवीला, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचा नाव घेतलं जाईल तर ते अहिल्यादेवी घ्यावं लागेल."
पुढे फडणवीस म्हणाले की, "जगातल्या या आक्रांत्यांना माहिती होतं भारताची ताकद ही अध्यात्मात आहे. भारतीयांची ताकद ही भाविकतेत आहे. तसेच इथल्या मंदिरामध्ये, घाटांमध्ये या ठिकाणी त्यांना जी ऊर्जा मिळते त्या सर्व प्रेरणा स्त्रोतांमध्ये आहे. हा भाविक यांच्या भावनेला जर ठेच पोहोचवली तर, भारताला गुलाम करु शकतो. या सर्व आक्रत्यांनी कुठे काशीच मंदिर तोड कुठे अयोध्येच मंदिर तोड कुठे, कृष्णाची जन्मभूमी तोड, ज्योतिंर्लिंग भंग करण्याचे काम आमचं तेज तप भंग करण्याचे काम हे त्याठिकाणी केल आहे. अशा परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी ठरवलं की, मी माझ्या राज्यापुरता विचार करणार नाही."